वणीकरांनो सज्ज राहा…! आज रंगणार फुटबॉलचे महायुद्ध

राज्यस्तरीय स्पर्धेचे आज फायनल, परदेशी खेळाडू प्रमुख आकर्षण

0 586

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये आज राज्यस्तरीय फुलबॉल सामन्यांचे सेमीफायनल आणि त्यातून ठरणा-या विजेत्यांमध्ये फायनल सामना रंगणार आहे. दुपारी 2 वाजता चंद्रपूर व यवतमाळ या संघात पहिली सेमीफायनल होणार आहे. तर दुपारी 4 वाजता औरंगाबाद व अकोला संघा दरम्यान दुसरी सेमीफायनल होणार आहे. या दोन्ही सामन्यातील विजेत्या संघामध्ये संध्याकाळी 7 वाजता अंतिम सामना रंगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या तुर्नामेंटसाठी परदेशातूनही काही खेळाडू आले आहेत. नायजेरियन खेळाडू हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आह.

वणीमध्ये दिनांक 28 ते 31 जानेवारी पर्यंत 7 साईड राज्यस्तरीय फुलबॉल टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. हे सामने डे-नाईट आहे. वणीतील शासकीय मैदानावर युवा फुटबॉल स्पोर्टिंग असोसिएशनद्वारा या राज्यस्तरीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यभरातील 24 संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले परदेशी खेळाडू सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. वणीकरांचाही या तुर्नामेंटला एक प्रेक्षक म्हणून मिळालेला प्रतिसाद वाखाण्याजोगा आहे.

या तुर्नामेंटमध्ये बक्षिसांची चांगलीच लयलूट आहे. पहिलं बक्षीस 30 हजार रुपये व ट्रॉफी सुनील कातकडे यांच्यातर्फे दिले जाणार आहे. दुसरे बक्षिस 20 हजार रुपये व ट्रॉफी आहे. हे बक्षीस वै. रुधाजी देरकर यांच्या स्मृती पित्यर्थ ठेवण्यात आले आहे. तर तिसरे बक्षिस 10 हजार रुपये रोख हे वणीतील माजी फुटबॉल खेळाडू हरिभाऊ पांडे यांच्यातर्फे देण्यात येत आहे. यासोबतच विविध वैयक्तिक बक्षीस ठेवण्यात आले आहेत.

नायजेरियन खेळाडूसोबत वणीकर

फुटबॉल जरी आपल्या मातीतला नसला तरी खास मातीशी नातं सांगणारा हा खेळ आहे. आधी वणी हे फुलबॉलचं एक नावाजलेलं केंद्र होतं पण काही वर्षांपूर्वी हा खेळ वणीतून हद्दपार झाला होता. मात्र काही तरुणांनी पुढे येऊऩ गेल्या 10 ते 12 वर्षांपासून वणीमध्ये पुन्हा हा खेळ सुरू केला. नवीन खेळाडू तयार केलेत. खेळाला पुन्हा प्रसिद्धी मिळवून दिली. वणीतील काही खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचले आहेत.

या स्पर्धेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात राज्यभरातील नामवंत खेळाडू वणीत आले आहेत. ही वणीकरांसाठी एक मेजवानीच म्हणावी लागेल. वणीमध्ये फुटबॉल या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी व सेमिफायनल आणि फायनल सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.