ऑटो पलटल्याने एकाचा मृत्यू, चार जखमी

करणवाडीजवळ अपघात, शिवनाळाा गावावर शोककळा...

0 1,440

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी यवतमाळ राज्य महामार्गावर  मारेगावहून प्रवाशांना घेऊन जाणारा ऑटो पलटला. यात एक ठार झाला तर चार जण जखमी झाले आहेत. करणवाडी गावाजवळ हा अपघात झाला.

संध्याकाळी मारेगावहून शिवनाळा  गावाकडे ऑटो (mh 29 m5311) जात  होता संध्याकाळी  6:40 च्या  दरम्यान ऑटो चे  संतुलन बिघडल्याने ऑटो उलटला. हा प्रकार इतका भीषण होता की यात ऑटोने दोन पलटी घेतल्या. यात एकाचा मृत्यू झाला तर चार गंभीर  झाले.

मारेगाव शहरात मंगळवारला आठवडी बाजार भरतो. बाजारात आठवडाभराचे सामान घेण्यासाठी शिवनाळl   गावाचे रहिवाशी मारेगाव येथे आले होते. बाजार  घेतल्यानंतर हे रहिवाशी गावाकडे जात होते. मात्र जाताना अचानक चालकाचे संतुलन बिगडल्याने ऑटोला अपघात झाला.

या घटनेची माहिती मिळताच काही  नागरिकांनी मारेगाव ग्रामीण रुग्णालययात जखमींना भर्ती केले. यात अजाब  कवडू  टेकाम (45) यांचा उपचारा दरम्यान  मृत्यू  झाला  तर दिलीप  वारलू  ढोबरे (40) मनोहर महादेव  आत्राम ( 21) बारीकराव  कान्हू  टेकाम (41) रवींद्र केशव  रामपुरे (25)  हे सर्व राहणार शिवनाळा जखमी झाले.

यातील दिलीप ढोबरे व बारीकराव टेकाम यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची  माहिती आहे. घटनेचा तपास  मारेगाव पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.