शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

वर्षाचा शेवट दु:खद घटनेने

0 934

विवेक तोटेवार, वणी: सार्वला येथील एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. सावर्ला येथे ही घटना घडली.

सोमवारी सकाळी 7.30 वाजता शेतकरी संतोष विठ्ठल पिंपळकार (42) यांनी आपल्या राहत्या घरी फाट्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कळताच त्यांची बहीण विमल यांनी संतोषचे मामसासरे प्रवीण सातपुते यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पुढील तपासणीसाठी संतोषला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश हिवसे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.